हृदयरोग असणाऱ्या व्यक्तीला तब्बल साडेतीन कोटींचं वीजबिल आलं. मध्य प्रदेशच्या ग्वालियरमधील प्रियंका गुप्ता यांना तब्बल ३४१९ कोटींचं वीजबिल आलं.वीजबिल पाहताच त्यांचा रक्तदाब वाढला तर सासऱ्यांना धक्काच बसला. प्रियंका गुप्तांच्या सासऱ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.मध्य प्रदेशच्या मध्य क्षेत्र विद्युत वितरण कंपनीकडून संबंधित चूक दुरुस्त करण्यात आली.संबंधित गुप्ता कुटुंबाला नंतर दुरुस्तीचं १३०० रुपयांचं बिल देण्यात आलं.विद्युत कंपनीनं ही मानवी चूक असून संबंधितांवर कारवाई केल्याची माहितीही दिली.कर्मचाऱ्यानं वीजबिलाच्या ठिकाणी चुकून ग्राहक क्रमांक टाकल्याचं कंपनीनं सांगितलं.